आमच्याबद्दल
गावाविषयी माहिती
बेझे हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात बेझे हे गाव आहे. बेझे हे नाशिक पासून ३० किमी अंतरावर आहे.येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.भात,गहू,बाजरी,टोमाटो, सर्व प्रकारचा भाजीपाला पिकवणारे गाव आहे .बेझे अंतर्गत अंधारवाडी एक वस्ती आहे.बेझे येथे शिलाई मातेचे मंदिर आहे.बेझे शेजारी चाकोरे हे गाव असून हे एक सिंहस्थ कुंभमेळ्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.चाकोरे येथील लोकांचा व्यवसाय हा प्रामुख्याने शेती आचाकोरे अंतर्गत सागवाडी हि वस्ती आहे. बेझे व चाकोरे हि दोन्ही गावे गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले असून त्याना ऐतिहासिक असे महत्व आहे.
भौगोलिक माहिती
बेझे व चाकोरे हे नाशिक पासून ३० किमी व त्र्यंबकेश्वर पासून १२ किमी अंतरावर असून गोदावरी नदी काठी वसलेले धार्मिक व प्रेक्षणीय गाव आहे.
लोकसंख्या
खाली जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार बाफनवीहिरचे संक्षिप्त लोकसंख्या विहंगावलोकन आहे.
|
लोकसंख्या
|
स्री
|
पुरुष
|
एकूण
|
| |
|
|
|
|
अनु जमाती
|
४०५
|
४२९
|
८३४
|
|
अनु जाती
|
१०७
|
११३
|
२२०
|
|
सर्वसाधारण
|
१८९
|
१९४
|
३८९
|
|
एकूण
|
७०१
|
७४२
|
१४४३
|
| |
|
|
|
महत्वाची स्थळे
शिलाई देवी मंदिर- शिलाई देवी,हे "क " वर्ग तीर्थक्षेत्र असून स्वयंभू देवस्थान आहे. नवसाला पावणारी देवी अशी तिची ख्याती असून साडेतीन शक्तीपिठापैकी एक असलेल्या माता सप्तशृंगीची मोठी बहिण मानली जाते. येथे चैत्र पौर्णिमेला येथे मोठी जत्रा भरते तसेच नवरात्रोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो.त्र्यंबकेश्वर पासून १२ किमी अंतरावर असलेल्या या बेझे गावातील शिलाई मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रोजच वर्दळ असते.
चाकोरे तीर्थक्षेत्र - सिंहस्थाचे प्राचीनत्व जपणारे गाव म्हणून चाकोरे गावाची ओळख आहे . पूर्वी सिंहस्थ कुंभमेळा गावातील चक्रतीर्थावर भरायचा अशी नोंद आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ठिकाण म्हणून या चाकोरे तीर्थक्षेत्राचे ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे .नाशिक त्र्यंबकेश्वर महामार्गावरील बेझे फाटा इथून हे ठिकाण ५ किमी अंतरावर व त्र्यंबकेश्वर पासून १२ किमी अंतरावर आहे.
- गौतमी गोदावरी धरण - गौतमी गोदावरी हे गोदावरी नदीवरील एक महत्त्वाचे धरण आहे. हे धरण बेझे गावाजवळ असून ते पर्यटकांसाठी एक सुंदर आणि लोकप्रिय स्थळ आहे.
- चाकोरे देशातील तिसरे मधाचे गाव-महाराष्ट्रामध्ये 'मधाचे गाव' ही संकल्पना राबवली जात असून, यानुसार देशातील तिसरे व जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव म्हणून चाकोरे गाव विकसित होत आहे.
आसपासची गावे
चाकोरे,पिंपरी त्र्यं , तळवाडे त्र्यं, अंजनेरी, राजेवाडी